Site icon

Nashik : दीड लाख स्क्वेअर फुट जागेत साकारतेय मिनी मंत्रालयाची पर्यावरणपुरक इमारत

 नाशिक : वैभव कातकाडे

दिड लाख स्क्वेअर फुट जागेत बांधकाम, २ मजल्यांची प्रशस्त पार्किंग, सध्या ३ आणि प्रस्तावित ३ अशा एकूण ८ मजल्यांची पर्यावरणपुरक प्रशस्त इमारत. हे वर्णन कोणत्या कॉर्पोरेट इमारतीचे नाही तर नाशिकच्या प्रस्तावित मिनी मंत्रालयाचे आहे. या प्रशासकिय इमारतीसाठी आतापर्यंत ४१ कोटी रुपयांच्या प्रशासकिय मान्यता झाल्या आहेत. यामधध्ये इलेक्ट्रिक, अग्निशमन, वातानुलुकीत या बाबींचा समावेश आहे. जिल्ह्याच्या दृष्टिने सर्वात महत्वाची असलेली इमारत म्हणून या इमारतीकडे बघितले जातेय.

पर्यावरणपुरक इमारत ही संकल्पना राबविताना या ठिकाणी सौरऊर्जेचा उष्णता व प्रकाश मिळविण्यासाठी वापर, नैसर्गिक वायुवीजन, निर्मितीसाठी कमी ऊर्जा लागणार्‍या तसेच पर्यावरणास पूरक ठरणार्‍या वस्तूंचा बांधकामात वापर, पाण्याच्या व ऊर्जेच्या वापरात काटकसर, घरातील हवेचा दर्जा योग्य राखणे, पर्जन्य जलसंधारण तसेच मोकळी व खेळती हवा यांचा समावेश होतो. इमारतीचे डिझाईन तयार होत असताना याकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे.

शहराच्या पश्चिम भागातील त्र्यंबकरोडलगत ही भव्य वास्तु उभी राहत आहे. मुंबई आग्रा हायवेपासून अवघ्या साडेतीन किमी अंतरावर तसेच शहरातील प्रस्तावित मेट्रो स्थानक हाकेच्या अंतरावर असल्याने तालुक्याच्या ठिकाणाहून येणे देखिल सोपे होणार आहे. जिल्ह्यातील महत्वाचे प्रशासकिय कार्यालये एकाच छताखाली असणार आहे. त्यामध्ये जिल्हा ग्रामिण यंत्रणा, जिल्हा आरोग्य यंत्रणा, राष्ट्रिय आरोग्य मिशन, बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा, जिल्हा ग्रामपंचायत विभाग यांचा समावेश असणार आहे. या इमारतीच्या तळ मजल्यावर चारचाकी वाहनासाठी तर पहिल्या मजल्यावर दुचाकी वाहनांसाठी प्रशस्त वाहनतळ असणार आहे. या ठिकाणी सव्वाशे चारचाकी तर सहाशे दुचाकींचा समावेश आहे. याठिकाणीच स्टोअर रुम, वाहनचालक कक्ष असणार आहे. सध्या कामास गती प्राप्त झालेली आहे, काम प्रगतीपथावर आहे. तळमजला ते दुसरा मजला यांचे स्ट्रक्चर काम सुरु आहे. तरी येत्या काही महिण्यात काम पुर्ण होईल असा विश्वास कार्यकारी अभियंता यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा :

The post Nashik : दीड लाख स्क्वेअर फुट जागेत साकारतेय मिनी मंत्रालयाची पर्यावरणपुरक इमारत appeared first on पुढारी.

Exit mobile version