Nashik : देवळा येथे कर्नाटक मधील शिवकुमार महास्वामींचे स्वागत

शिवकुमार महास्वामी,www.pudhari.news

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा 

भक्ति साधना केंद्र श्री सिद्धारूढ आश्रम निवाणे ता. कळवण येथे दि. २४ ते २८ या कालावधीत वार्षिक महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. डॉ. शिवकुमार महास्वामी चिदंबराश्रम श्री सिद्धारूढ मठ (बिदर, कर्नाटक) यांच्या दिव्य सानिध्यात तसेच त्यांच्याच कृपा पात्र परमशिष्या पूज्यपाद सुश्री मनीषा दिदी, निवाणे यांच्या मार्गदर्शनाने हा पवित्र सोहळा संपन्न होतो आहे.

या सोहळ्यासाठी सदगुरू शिवकुमार महास्वामी यांचे देवळा येते आगमन झाले असून त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी महास्वामींनी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यानिमित्ताने सदगुरू शिवकुमार महास्वामींचे देवळा शहरात आगमन होताच त्यांचे उपनगराध्यक्ष अशोक आहेर, माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर आदींसह शिष्य वर्गाने पुष्पहार अर्पण करून स्वागत केले. याप्रसंगी परमशिष्या मनीषा दिदी, सरला पवार, भिकन पवार, चित्रा ठाकरे, शरद पाटील, हिरामण गांगुर्डे, राजू शिलावट आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा : 

The post Nashik : देवळा येथे कर्नाटक मधील शिवकुमार महास्वामींचे स्वागत appeared first on पुढारी.