
नांदगाव : पुढारी वृत्तसेवा
येथील रेल्वे प्लॅटफॉर्मवर एका माथेफिरुने पोलीस अधिकारी (आरपीएफ) डी. के. तिवारी यांच्यावर चाकुने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी मालेगांव येथे हलविण्यात आले असून या घटनेने नांदगाव रेल्वेस्टेशनवर एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान आज (दि. २०) सकाळी ५ वाजता रेल्वे आरपीएफ जवानाने एका माथेफिरुस ताब्यात घेऊन कार्यालयात आणले. पोलीस अधिकारी डी. के तिवारी हे सकाळी साडेपाच वाजता कार्यालयात आले. त्यांनी त्या माथेफिरुस हटकले असता त्याने त्याच्या जवळील धारदार हत्याराने तिवारी यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यातून तिवारी थोडक्यात बचावले, स्वत:ची सुटका करीत ते कार्यालयातून बाहेर पडले. दरम्यान त्यांना उपचारासाठी मालेगाव येथे हलविण्यात आले आहे.
माथेफिरुने तिवारी यांच्यावर हल्ला करुन तेथून पळ काढला. रेल्वेच्या एका बोगीवर जाऊन तेथे चांगलाच धिंगाना घातला. यावेळी त्याने कुणालाही आपल्याजवळ येऊ दिले नाही. अखेरीस नांदगाव शहर व रेल्वे पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने माथेफिरु सुकेश लिलाधर तिरडे (२५) गोंदिया यास ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा :
- नाशिक : रॉयल बेकर्सवर एफडीएचा छापा, आरोग्यास घातक खाद्यतेल जप्त
- बेळगाव : अलमट्टीतून विसर्ग आता 1 लाख 12 हजार क्युसेकवर
- कोल्हापूर दक्षिणमध्ये काँग्रेसपुढे आव्हान?
The post Nashik : नांदगाव रेल्वेस्टेशनवर माथेफिरुचा धिंगाणा ; पोलीस अधिकाऱ्यावर चाकुचा हल्ला appeared first on पुढारी.