
कळवण : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील नांदुरी येथील मुंबई तडका हॉटेलमागे सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर अपर पोलिस अधीक्षक नाशिक यांच्या विशेष पथकाने छापा टाकला. यात एकाला मुद्देमालासह कळवण पोलिस ठाण्यात अटक करण्यात आली.
कळवण तालुक्यातील सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी नांदुरी गावातील बसस्थानकासमोर असलेल्या मुंबई तडका हॉटेलमागे मटका जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने बुधवारी (दि. २७) दुपारच्या वेळी छापा टाकला. त्यात भगवान रामदास भोये (४२) याला मिलन मटका जुगार खेळताना व खेळविताना अटक करण्यात आली. जुगार खेळणारे इतर इसम पळून जाण्यात यशस्वी झाले. भोयेकडून मटका खेळण्याचे साहित्य व ३ हजार १०० रुपये जप्त करण्यात आले आहे.
हेही वाचा :
- West Bengal SSC scam : ती ‘ब्लॅक’ डायरी आणि अभिनेत्री अर्पिता मुखर्जी; काय आहे शिक्षक भरती घोटाळ्याशी कनेक्शन?
- पुणे : 284 ग्रामपंचायतींची उद्या आरक्षण सोडत
- पुणे : लोकमान्य टिळक प्रागतिक विचारांचे होते; डॉ. गो. बं. देगलूरकर यांचे मत
The post Nashik : नांदुरीत मटका अड्ड्यावर छापा, एकाला अटक appeared first on पुढारी.