Nashik : नाशकातल्या गोदा घाटावर पुरोहित आमनेसामने, यजमान पळवल्याच्या आरोपावरुन हमरीतुमरी ABP Majha

<p>नाशिकच्या गोदा घाटावर पुरोहितांच्या दोन गटांमध्ये चांगलीच हमरीतुमरी झाली. पूजेसाठी आलेला यजमान पळविण्याच्या कारणावरून हा वाद झाला. यावेळी काही पुरोहितांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला. मात्र, या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यापूर्वी त्रंबकेश्वरमध्ये पूजेच्या कारणावरून पुरोहितांमध्ये हाणामारीच्या अनेक घटना घडल्यात. मात्र आता नाशिकचा गोदाघाटवरही पुरोहितांमध्ये वाद झाल्याचा व्हीडिओ समोर आल्यानं टीकेचा सूर ऐकायला मिळतोय.&nbsp;</p>