Nashik : नाशकात 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला सुरुवात ABP Majha

<p>नाशकात ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला सुरुवात झालीय. कुंभमेळा नगरीत ३ ते ५ डिसेंबरदरम्यान सारस्वतांचा मेळा भरणार आहे. भुजबळ नॉलेज सिटीत कुसुमाग्रसनगरी वसवण्यात येतेय. तिथे जेसीबीच्या साहाय्यानं नियोजित मुख्य सभामंडपाच्या ठिकाणी सपाटीकरण सुरु आहे. मुख्य सभामंडपात एकाच वेळी कमीत कमी ८ हजार साहित्य रसिक बसू शकतील अशी आसन व्यवस्था केली जातेय. स्वागताध्यक्ष आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळांनी संमेलन यशस्वी करण्यासाठी सूचना दिल्या आणि तिथल्या कामाचा आढावा घेतला. संमेलनस्थळाच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्याची डागडुजी आणि सुशोभीकरणही केले जाणार आहे.&nbsp;</p>