Nashik : नाशिककरांची दिवाळी आता फटाके वाजवून; फटाकेबंदीचा निर्णय मागे घेतला

<p>उत्तर महाराष्ट्राला फटाके वाजवून दिवाळी साजरी करता येणार आहे. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीनंतर फटाकेबंदीचा निर्णय मागे घेण्यात आलाय. उत्तर महाराष्ट्रात फटाकेबंदी लागू करण्यासंदर्भात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी काल निर्देश दिले होते. मात्र हे निर्णय मागे घेण्यात यावेत म्हणून भुजबळांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटेंशी संवाद साधला.</p>