Nashik | नाशिकची ग्रामदेवता कालिका देवीच्या मंदिर संस्थानाचा अजब निर्णय, दर्शनासाठी पैसे घेणार

<p>लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आणि नाशिकची ग्रामदेवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कालिका देवीच्या मंदिर संस्थानने एक अजब आणि वादग्रस्त असा निर्णय घेतलाय. नवरात्रोत्सव काळात कालिका मातेच्या दर्शनासाठी प्रति भाविक शंभर रुपये मंदिर प्रशासन आकारणार आहे, ऑनलाईन आणि इतर सर्व यंत्रणा उभी करण्यासाठी खर्च लागणार असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलय. यासोबतच टोकन असेल तरच मंदिरात प्रवेश मिळणार असून ऑनलाईन पद्धतीने हे टोकन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, टोकन धारक व्यतिरिक्त ईतरांना पोलिसांकडून मंदिर प्रवेश बंदी करण्यात आली आहे. 24 तास मंदिर खुले राहणार असून एका तासात 60 भाविकांनाच मंदिरात जाता येणार आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये यासाठी मंदिर आवारात तसेच बाहेरील परिसरात कुठलाही व्यवसाय करता येणार नसून प्रसाद, फुले तसेच नारळ देवीला अर्पण करता येणार नाही. पोलिस आणि महापालिका प्रशासनासोबत शुक्रवारी दुपारी मंदिर संस्थानची बैठक पार पडली असून या बैठकीत हे सर्व निर्णय घेण्यात आले आहेत.</p>