Nashik : नाशिकच्या निफाडमध्ये पारा 6 अंशांनी घसरला, 6.1 अंश तापमानाची नोंद ABP Majha

<p>मुंबईप्रमाणे राज्यात अनेक ठिकाणी गुलाबी थंडीचा अनुभव येतोय.. नाशिकच्या निफाडमध्ये पारा ६ अंशांनी घसरलाय. निफाडमध्ये ६.१ अंश तापमानाची नोंद झालीय. &nbsp;कालपासून चांगलीच थंडी पडायला सुरुवात झाली आहे. निफाडमध्ये काल पारा १२ अंशांवर आला होता..आज तब्बल ६ अंश सेल्सियसनी तापमान घसरलंय. १९ जानेवारीनंतर थंडीचा कडाका अजूनही वाढण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.&nbsp;</p>