Nashik नाशिकमध्ये बिबट्याचा नागरिकांवर हल्ला, सातारा, संगमनेर, चाफळ, सावंतवाडीमध्येही बिबट्याची दहशत

<p>नाशिकच्या सामनगाव परिसरातील अस्वले मळा, अश्विनी कॉलनीत गेल्या एक महिन्यापासून बिबट्याचा वावर असल्याने नागरिक दहशतीत जीवन जगतायत. काल संध्याकाळी काही नागरिकांना अश्विनी कॉलनीत बिबट्याचे दर्शन झाले तर आज सकाळच्या सुमारास त्र्यंबक गांगुर्डे यांची शेळी बिबट्याने फस्त केली. वनविभागाने या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते आहे.</p>