Nashik : नाशिकमध्ये भाजप नेत्याची हत्या, सातपूर पोलीस ठाण्याबाहेर भाजपचा ठिय्या ABP Majha

<p style="text-align: left;">नाशकात हत्यांचं सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाहीय.. आज सकाळी भाजपचे पदाधिकारी अमोल इघे यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. राजकीय वैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती हाती येतेय. अमोल इघे हे &nbsp;सातपूर भाजप मंडळाचे अध्यक्ष होते. अज्ञात व्यक्तीनं त्यांना फोन करुन घराबाहेर बोलवून घेतलं आणि त्यांच्यावर वार करुन त्यांची हत्या केली. गेल्या ५ दिवसातली नाशिकमधली ही हत्येची तिसरी घटना आहे. &nbsp;दरम्यान नाशकातल्या सातपूर पोलीस ठाण्याबाहेर भाजपनं ठिय्या आंदोलन सुरू केलंय..&nbsp;</p> <p style="text-align: left;">&nbsp;</p>