Nashik : नाशिकमध्ये रुग्णालयात इनोव्हा कार घुसवणारा नगरसेविकेचा पती पोलिसांना शरण ABP Majha

<p>नाशिकमध्ये बिटको रुग्णालयात सिनेस्टाईल इनोव्हा कार घुसवून धुडगूस घालणारा भाजप नगरसेविकेचा पती कन्नू ताजणे पोलिसांना शरण आला आहे. १५ मे रोजी बिटको&nbsp; रुग्णालयात कार घुसवून त्यानं तोडफोड केली होती आणि कर्मचाऱ्यांच्या दिशेनं पेव्हर ब्लॉकही भिरकावले होते. रुग्णांना उपचार मिळत नसल्याचा आरोप करत त्यानं हा धुडगूस घातला होता. अटकपूर्व जामीन &nbsp;न मिळाल्यानं काल रात्री तो नाशिकरोड पोलीस ठाण्यात हजर झाला.&nbsp;</p>