Nashik | नाशिक पोलिस दलातील 31 वर्षीय तरुणाचं हार्टअ‍ॅटकनं निधन; आयुक्त दिपक पांडेय यांनी दिला खांदा

<p>नाशिक पोलिस दलात दंगल नियंत्रण कक्षामध्ये कार्यरत असणाऱ्या प्रतीक विलास जाधव या 31 वर्षीय तरुण कर्मचाऱ्याचे गुरुवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मनमिळावू स्वभाव असलेल्या प्रतीकच्या अशा जाण्याने जाधव कुटुंबासह पोलिस दलावर शोककळा पसरलीय. प्रतीक वास्तव्यास असलेल्या आडगाव परिसरातून गुरुवारी संध्याकाळी अंत्ययात्रा निघाली विशेष म्हणजे यात प्रतिकच्या नातेवाईकांसोबतच पोलिस आयुक्त दिपक पांडेय यांनी पोलिस कुटुंब प्रमुख म्हणून सहभाग घेत खांदाही दिलाय. एकीकडे कोरोना काळात माणूस, नातेवाईक एकमेकांपासून दुरावत चालल्याचं चित्र बघायला मिळत असतानाच दुसरीकडे पांडेय यांच्या रूपाने सगळ्यांनाच माणूसकीचे दर्शन घडले.</p>