Nashik : नाशिक महापालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू ABP Majha

<p>नाशिक महापालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्यानं खळबळ उडालीय. डॉ. सुवर्णा वाजे यांचा मृतदेह वाडीवऱ्ह गावाजवळ जळालेल्या त्यांच्याच चारचाकी वाहनात आढळलाय. काल दुपारी त्या पालिका रुग्णालयात कामावर जाण्यासाठी घरातून निघाल्या होत्या. रात्री ९ वाजेपर्यंत घरी न परतल्यामुळे त्यांचे पती &nbsp;आणि बांधकाम व्यावसायिक संदीप वाजे यांनी अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरम्यान रात्री वाडीवऱ्ह गावाजवळ चारचाकी जळत असल्याशी माहिती पोलिसांना मिळाली. या वाहनात सुवर्णा यांचा मृतदेह आढळलाय. डॉ. वाजे यांचा अपघात झाला की घातपात याबाबत अद्याप काहीही स्पष्ट नाही.&nbsp;</p>