नाशिक : (निफाड) : निफाड तालुक्यातील महाजनपूर येथील सुपुत्र वीरजवान रंगनाथ वामन पवार (44) यांना राजस्थान येथे भारतीय सैन्यदलात कर्तव्य बजावत असताना वीर मरण आल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेने निफाड तालुक्यावर शोककळा पसरली असून त्यांच्या मृत्यूचे अद्याप कारण समजू शकलेले नाही. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, आई-वडिल असा परिवार आहे.
रंगनाथ वामन पवार यांचे बारावी पर्यंतचे शिक्षण झाले होते. त्यांच्या निधनाने अतिशय दु: ख झाले. महाजनपूर सारख्या छोट्याशा खेड्यातून पुढे येत जवान रंगनाथ पवार यांनी अतिशय हालाखीच्या परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले. ते भारतीय सैन्यदलात दाखल झाले होते. त्यांच्या निधनाने भारत मातेने एक वीर सुपुत्र गमावला आहे. मी व माझे कुटुंबीय शहीद जवान रंगनाथ पवार यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असल्याची भावना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.
निफाड तालुक्यातील महाजनपूर येथील सुपुत्र वीर जवान रंगनाथ पवार यांना राजस्थान येथे भारतीय सैन्यदलात कर्तव्य बजावत असतांना वीर मरण आले. अतिशय दु:ख झाले. महाजनपूर सारख्या छोट्याश्या खेड्यातून पुढे येत जवान रंगनाथ पवार यांनी अतिशय हालाखीच्या परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले. pic.twitter.com/iax1tiSFif
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) July 15, 2022
The post Nashik : निफाडवर शोककळा ; महाजनपूरच्या जवानाला राजस्थानमध्ये वीरमरण appeared first on पुढारी.