Nashik : नियम मोडून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अभय, मात्र पाच कार्यकर्त्यांवर गुन्हा

<p>महाराष्ट्रात मंत्र्यांसाठी वेगळा आणि सामान्य जनतेसाठी वेगळा कायदा आहे का हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. याचे कारण नाशिक पोलिस आयुक्तांनी मंत्र्याना अभय देत केवळ कार्यकर्त्यांवर कारवाई केली आहे. कोरोनामुळे राज्यभरातील मंदिर सध्या बंद आहे, मात्र गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नियम मोडत नाशिकच्या श्री नवश्या गणपतीची आरती केली. या प्रकरणानंतर मात्र यावर टीकेचे सूर उमटत आहेत.</p>