Nashik : निवडणुकीच्या तोंडावर प्रकल्प हायजॅक करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न, मनसेचा आरोप

<p>नाशिक दौऱ्यावर असलेल्या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचं भूमिपूजन केलं. मनसेची महापालिकेवर सत्ता असतांना २०१७मध्ये हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते संग्रहालय उभारण्यात आलं होतं. मात्र मनसेची सत्ता गेल्यानंतर काहीकाळ हे संग्रहालय आणि संग्रहालयाच्या आवारातील उद्यान धूळखात पडलं होतं.</p>