Nashik : नो व्हॅक्सिनेशन, नो एन्ट्री हा नवा फॉर्म्युला; नाशिक जिल्हा प्रशासनाचे आदेश ABP Majha

<p>&nbsp;राज्यभरात लसीकरण पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जात आहेत. कुठे लसीकरणासाठी रात्रपाळी केली जातेय, तर &nbsp;कुठे दंडात्मक कारवाई, नाशिक महापालिकेनंही लसीकरणासाठी निर्बंधांचा बडगा उगारलाय. नो व्हॅक्सिनेशन, नो एन्ट्री हा नवा फॉर्म्युला आता नाशिक महापालिका राबवणार आहे. त्या अंतर्गत बाजारपेठ, सरकारी कार्यालयं, महत्वाची सार्वजनिक ठिकाणं, काही खासगी अस्थापना या ठिकाणी जाण्यासाठी लसीकरणाचं प्रमाणपत्र बंधनकारकर करण्यात आलंय. त्यामुळे लसीकरणात टाळाटाळ करणारे आता तरी लस घेण्यासाठी बाहेर पडतात का पाहुया...</p>