Nashik : पत्र्याच्या चौकीत बसवून Scotland Yard सारख्या कामाची व्यवस्था का करता : पोलिस आयुक्त दीपक पांडे
<p>पोलीस चौकीतील पोलिसांच्या दारू पार्ट्याना पोलीस चौक्यांची रचना जबाबदार असल्याचा अजब दावा खुद्द पोलीस आयुक्तांनी केल्यानं पोलीस चौक्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय, शहरातील 75 टक्के पोलीस चौक्या अनधिकृत असल्याचा धक्कादायक खुलासा आयुक्तांनी केलाय. यावरून लोकप्रतिनिधी आणि पोलीस ह्या नव्या वादाची ठिणगी पडलीय. </p>