
ञ्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
सततच्या पावसाने नदी नाले खळाळले आहेत. रविवारची सुटी बहरलेल्या निसर्गाच्या सानिध्यात घालवण्यासाठी पहिणे परिसरात कुटुंबासह सहलीला आलेल्यांची संख्या लक्षणीय होती. रविवारी पावसाने उघडीप दिली. त्यामुळे पर्यटकांच्या आनंदाला उधाण आलेले पहावयास मिळाले. लग्नाचा वाढदिवस, मित्राचा-मैत्रीणीचा अथवा स्वत:चा वाढदिवस साजरा करण्यासाठी ञ्यंबकेश्वर परिसरातील पावसाळी पर्यटनस्थळांना प्राधान्य मिळत आहे.
ञ्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेले भाविक पर्यटक पाचशे रूपयात थेट हरिहर किल्ल्याच्या पायथ्याशी रिक्षाने जात होते. हरिहर किल्ला आणि सर्व पर्यटनस्थळावर दुपारी तीन वाजेनंतर प्रवेश बंद करण्यात आले होते. पर्यटकांच्या वाहनांनी संपूर्ण नाशिक त्र्यंबक रस्ता फुलला होता.
ञ्यंबकेश्वर पोलिसांनी शनिवार प्रमाणेच रविवारी देखील मोहीम राबवत सुरक्षे बाबत प्रबोधन केले. तसेच असुरक्षीत ठिकाणावर जाण्यापासून रोखले. पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे आणि सहकारी यांनी मद्यपींना मज्जाव करत कुटुंबासह आलेल्या पर्यटकांना दिलासा मिळवून दिला. घाट रस्त्यात वाहन उभे करून नाचणे, टारगटपणा करणे यासारख्या शांतताभंग करणा-यांना जरब बसवली आहे.
हेही वाचा :
- जोगेश्वरीत रिक्षाचालकाच्या गळ्यावर चाकू लावून लुटले
- पुणे : जुलै महिना संपला, तरी ओढे कोरडे
- Sachya tarzan murder case : सच्या टारझन खूनप्रकरणातील संशयिताच्या कोठडीत वाढ
The post Nashik : पर्यटकांनी बहरला पहिने घाट appeared first on पुढारी.