Nashik : पुण्यातल्या दोघांनी नाशिकच्या व्यावसायिकास 47 लाखांना घातला गंडा

money fraud

नाशिकरोड : सब कॉन्ट्रॅक्ट देण्याच्या बहाण्याने पुण्यातील दोघांनी मिळून येथील व्यावसायिकास 47 लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार उपनगर पोलिस ठाण्यात प्रतित अशित शाह व क्रितीका अशित शाह (दोघे रा. पुणे) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजू बबन काकड (42, रा. नाशिकरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, देशातील नामांकित कंपनीत कोट्यवधी रुपयांचा ठेका मिळाल्याचे सांगून काकड यांना गुंतवणुकीस प्रोत्साहित केले. यासाठी संशयितांनी काकड यांना बनावट कागदपत्रे दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर काकड यांनी संशयितांना 63 लाख 40 हजार रुपये दिले. त्यापैकी संशयितांनी 16 लाख रुपये परत केले. मात्र उर्वरित 47 लाख 40 हजार रुपये संशयितांनी परत देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे काकड यांनी न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर उपनगर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गुन्हा पुणे शहरात घडल्याने उपनगर पोलिसांनी हा गुन्हा बंड गार्डन पोलिस ठाण्यात वर्ग केला आहे.

हेही वाचा :

The post Nashik : पुण्यातल्या दोघांनी नाशिकच्या व्यावसायिकास 47 लाखांना घातला गंडा appeared first on पुढारी.