Nashik : पॉलिशच्या बहाण्याने लांबवले अडीच लाखांचे दागिने

दागिने चोरी

नाशिक, दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा

सोने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने सोन्याचे मंगळसूत्र, बांगड्या व कानातील टॉप्स असे सुमारे दोन लाख 40 हजारांचे दागिने दोघा संशयितांनी लंपास केले. दिंडोरीतील विजयनगरमधील कृष्णाई बंगल्यातील शैला देशमुख (वय 62) यांना सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो, अशी बतावणी करत दोन भुरट्यांनी त्यांचे दागिने घेतले.

दागिने पॉलिश करण्याचे नाटक करत या भुरट्यांनी एक लाखाचे दोन तोळ्याचे मंगळसूत्र, एक लाखाच्या दोन तोळे वजनाच्या पाटली बांगडी, ३० हजारांचे सहा ग्रॅमचे कानातील टॉप्स लांबविले. हे भुरटे निघून गेल्यानंतर देशमुख यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. दोघा भुरट्यांविरोधात दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

The post Nashik : पॉलिशच्या बहाण्याने लांबवले अडीच लाखांचे दागिने appeared first on पुढारी.