Nashik : बनावट नोटा छापून चलनात आणणारे रॅकेट उध्वस्त, भाजीविक्रेतीच्या सतर्कतेमुळे सात जणांना अटक

<p>नाशिक : कोरोना काळात हातचा रोजगार गेला आणि बेरोजगारीचं संकट ओढावलं. मग आता पोटापाण्यासाठी काय करायचं म्हणून एका गँगने चक्क नोटा छापण्याचा छापखानाच सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस. नाशिक ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत बनावट नोटा &nbsp;छापणाऱ्या 7 जणांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. किती बनावट नोटा चलनात आणल्या याचा शोध घेण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.</p>