Nashik : बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू

बसच्या धडकेत महिला ठार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बसने धडक दिल्याने ४० वर्षीय महिला ठार झाल्याची घटना मंगळवारी (दि. २२) सकाळी सीबीएस परिसरात घडली. लता रामदास चव्हाण (रा .लेखानगर, सिडको) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

चव्हाण या मंगळवारी (दि. २२) सकाळच्या सुमारास जुने सीबीएसजवळील सिग्नलजवळ असताना हा अपघात झाला. बसने त्यांना धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. बसचालक अशोक शिंदे यांनी त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान लता चव्हाण यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा :

The post Nashik : बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू appeared first on पुढारी.