
पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
बहिणीची छेड काढत असल्याच्या कारणावरून निलगिरी बागेत राहणाऱ्या एका युवकाचा धारधार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना रात्री घडली असून, याप्रकरणी आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयित युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
निलगिरी बाग येथे राहणारा विकास नलावडे हा संशयीत आरोपीच्या बहिणीची छेड काढत होता, त्यातून संशयित आरोपी आणि त्याच्यात वाद झाले होते. संशयित आरोपीला विकास याने निलगिरी बागेजवळ बोलावून घेतले आणि मला तुझा बहिणीशी लग्न करायचे आहे, असे सांगितले. त्यातून राग अनावर झालेल्या संशियत आरोपीने नलावडे याच्यावर चाकूने वार केले. यात साळवे हा गंभीर जखमी झाला, त्याला तातडीने आडगाव येथील वसंत पवार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास आडगाव पोलीस करित आहे.
हेही वाचा :
- नाशिक : खासगी सुरक्षारक्षकांची मनमानी चव्हाट्यावर; धक्काबुक्की, अरेरावीच्या तक्रारी येऊनही कारवाई नाहीच
- Ashok Chavan : महाराष्ट्राच्या राजकारणात गँगवॉर सुरू; एकमेकांना संपवण्याची भाषा – अशोक चव्हाण
The post Nashik : बहिणीची छेड काढणाऱ्या युवकाचा धारधार शस्राने खून appeared first on पुढारी.