Nashik ब्रह्मगिरी उत्खनन, पर्यावरण राज्यमंत्र्यांचे कारवाईचे आदेश, Brahmagiri ची लूट कधी थांबणार?

<p>नाशकातील ब्रह्मगिरी डोंगर उत्खननप्रकरणी ८ दिवसात कारवाई करण्याचे आदेश पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोड यांनी दिलेत. ब्रह्मगिरीसह सह्याद्री डोंगरावर अवैधरित्या उत्खनन होत असल्यानं ठोस कारवाईचे आदेश देण्यात आलेत. ब्रह्मगिरी पर्वताबाबत एबीपी माझानं आवाज उठवल्यानंतर जिल्हा प्रशासनानं टास्क फोर्सची स्थापना केली होती. त्यानंतर उत्खनन थांबले नसल्याचं टास्क फोर्स सदस्य आणि पर्यावरणप्रेमींनी पर्यावरण राज्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानं त्यांनी कारवाईचे आदेश दिलेत.&nbsp;</p>