Nashik : भागिदारीतून व्यावसायिकाची पावणेसात कोटी रुपयांची फसवणूक, जाहिरातीच्या कामातून नफा मिळवून देण्याचे दाखवले आमीष

Nashik News Update : पर्यटन विभागातील जाहिरातीच्या कामातून नफा मिळवून देण्याचे आमीष दाखवून व्यावसायिकाची तब्बत पावणेसात कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं उघडकीस आलं आहे. सुशील पाटील असं फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव असून याबाबत त्यांनी नाशिकमधील गंगापूर रोड पोलीस ठाण्यात तक्राकर दाखल केली आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणी 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुल्हा दाखल झालेल्या संशयितांमध्ये राजस्थानच्या मुख्यमंत्रीच्या मुलाचाही सहभाग असल्याचा सुशील पाटील यांनी आरोप केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील पाटील यांची गुजरात मधील सचिन वालेरा यांच्यासोबत गेल्या काही वर्षांपूर्वी ओळख झाली होती. या ओळखीतून दोघेजण व्यवसायात एकमेकांचे भागिदार झाले. सचिन वालेरा एका राजकिय पक्षाशी संबंधित असल्यामुळे गुजरात आणि राजस्थानमधील मोठ्या नेत्यांशी त्यांची जवळीक आहे. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या व्यवसायात भागिदारी करून सुशील पाटील यांनी स्लीपिंग पार्टनर म्हणून 6 कोटी 80 लाख रुपयांची  गुंतवणूक केली.

सुरुवातीच्या काळात गुंतवणुकीचा परतावा मिळाला. परंतु, सहा महिन्यापांसून पैसे मिळत नसल्यामुळे सचिन वालेरा यांच्यासह त्यांच्या इतर साथीदारांसोबत पाटील यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु, कोणासोबतच संपर्क होत नसल्यामुळे पाटील यांनी तक्रार दाखल केली. दरम्यान, सचिन वालेरा याचे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यांशी घनिष्ठ सबंध असून त्यांचा मुलगा वैभव हा सुद्धा सचिन वालेरा यांच्याच टीमचा सदस्य असल्याचा सुशील पाटील यांनी आरोप केला आहे.

सरकारी कामातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यामुळे पोलीसही अवाक झाले आहेत. परंतु, या प्रकरणात राजकिय नेत्याचे नाव समोर येत असल्यामुळे गुंता वाढत चालला आहे.  दरम्यान या प्रकरणातील तपासत काय निष्पन्न होते, त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक रियाज शेख यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

Nashik News : पोलीस चौकीत दारू पार्टी करणं पोलिसांना पडलं महाग, आयुक्तांकडून थेट निलंबनाची कारवाई

Nashik : महापौर, भाजप शहराध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल, कार्यक्रमासाठी परवानगी घेतली नसल्याचा नाशिक पोलिसांचा दावा

Nashik News : सेंट्रल किचन योजनेतील तब्बल 14 हजार किलो तांदूळ जप्त, ठेकेदाराचा कारनामा उघड