Nashik : मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे इगतपुरीत रस्त्याची डागडुजी, नागरिकांचे हाल प्रशासनाला दिसले नाही?

<p>सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नियोजित &nbsp;दौऱ्यामुळे इगतपुरी मधील रस्त्यांची अंधारातच &nbsp;मलमपट्टी सुरू आहे. मुंबई काँग्रेसच्याप्रशिक्षण शिबिराच्या उदघाटनसाठी अशोक चव्हाण सकाळी इगतपुरी मध्ये येणार आहेत, त्यांचा ताफा ज्या मार्गने जाणार त्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच काम युद्धपातळीवर सुरू आहे, गेल्या अनके महिन्यापासून नागरिकांना याच खड्यातून ये जा करावी लागत होती, खड्डे बुजविण्याची वारंवार मागणी करून ही काम होत नव्हते, आता या खात्याचे मंत्रीच येणार असल्याने अंधारात रस्ते चकाचक करण्याचं काम सुरू आहे.</p>