Nashik | मंदिरात प्रवेशबंदी असताना मंत्री जितेंद्र आव्हाड यांची नाशिकमध्ये कार्यकर्त्यांसह पूजा

<p>मंदिरात प्रवेश बंदी फक्त सर्वसामान्य भाविकांनाच का ? असा प्रश्न आता उपस्थित होतोय आणि ह्याला कारण ठरलय ते म्हणजे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज दुपारी नाशिकच्या श्री नवश्या गणपती मंदिराच्या चक्क गाभाऱ्यातच जाऊन गणपती बाप्पाची पूजा आणि आरती केली. आव्हाड यांचे कार्यकर्तेही त्यांच्यासोबत यावेळी उपस्थित होते. विशेष म्हणजे नाशकात विकेंड लॉकडाऊनही सुरु असतांना रविवारी आव्हाड यांनी मंदिरात पूजा केल्याने हा चर्चेचा विषय ठरतोय."</p>