Nashik : मधु मंगेश कर्णिक यांना यंदाचा जनस्थान पुरस्कार, भाषणात राजकारण्यांना सुनावले खडेबोल
<p>Nashik : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीनं दिला जाणारा मानाचा जनस्थान पुरस्कार वितरण सोहळा कुसुमाग्रज स्मारकात पार पडला. ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना यंदाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला, प्रतिष्ठानचे अध्यक्ष न्या, नरेंद्र चपळगावकर यांच्यां हस्ते सन्मान चिन्ह,सन्मान पत्र आणि एक लाख रुपये देऊन कर्णिक यांचा गौरव करण्यात आला.कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे 10 कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी होणार पुरस्कार वितरण सोहळा पुढे ढकलण्यात आला होता. दर वर्ष आड जनस्थान पुरस्कार दिला जातो. कुसुमाग्रज प्रतिष्ठान मध्ये सोहळा पार पडणार आहे, दर एक वर्षाआड हा सोहळा होत असतो. चपळगावकर यांनी मधू मंगेश कर्णिक यांच्यां साहित्याचा गौरव केला तर कर्णिक यांनी पुरस्कार स्वीकारताना राजकारण्यांना आपल्या भाषणाद्वारे चांगलेच खडेबोल सुनावले.</p>