Nashik मध्ये आज नोटांची छपाईच नाही! Nashik Currency Press च्या कामगारांचं कामबंद आंदोलन

<p>Nashik Currency Press : नाशिकमध्ये आज दिवसभरात नोटांची छपाईच झालेली नाही. नाशिक येथील करन्सी नोट प्रेस आणि प्रतिभूती मुद्रणालयातील कामगारांनी कामबंद आंदोलन केलंय. व्यवस्थापनाच्या कारभाराविरोधात कामगारांनी हे आंदोलन पुकारलंय. कामगारांच्या आंदोलनामुळे आज दिवसभरात नोटांची छपाईच झाली नाही. कामगारांना विश्वासात घेऊन काम केलं जात नाही, अचानक दुसऱ्या विभागात बदली केले जाते, अतिरिक्त कामाचा मोबदला दिला जात नाही अशा विविध कारणांसाठी आंदोलन करण्यात आलं. सकारात्मक प्रतिसाद दिला नाहीतर बेमुदत आंदोलनाचा इशारा देखील कर्मचाऱ्यांनी दिलाय.</p>