Nashik : मनमाडचा कचरा डेपो आगीत भस्मसात

मनमाड कचरा डेपो आग,www.pudhari.news

नाशिक (मनमाड): पुढारी वृत्तसेवा

नगर परिषदेच्या दहेगाव परिसरातील कचरा डेपोला मध्यरात्री भीषण आग लागली. पालिकेचे अग्निशमन दलाचे दोन्ही बंब नादुरुस्त असल्याने अक्षरश: बादल्यांनी पाणी आणून कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे नियंत्रण मिळविता आले नाही. रात्रीपासून लागलेली आग मंगळवारी दुसऱ्या दिवशीही धुमसत होती.

मनमाडपासून 4 किमी अंतरावर दहेगाव शिवारात पालिकेचा कचरा डेपो असून, त्यात शहरातील सर्व कचरा गोळा करून टाकला जातो. सोमवारी मध्यरात्रीनंतर या कचरा डेपोला अचानक आग लागली आणि पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. एकीकडे डंपिंग ग्राउंडची आग वाढत होती, तर दुसरीकडे मात्र पालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन्ही गाड्या नादुरुस्त असल्यामुळे आग कशी विझवावी, असा प्रश्न सफाई आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांन पडला. त्यांनी रात्री घटनास्थळी धाव घेऊन झाडाच्या फांद्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. सकाळी छोटा हत्तीतून ड्रममध्ये पाणी नेत बादल्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने भयानक रूप धारण केल्याने दुसऱ्या दिवशीही ती धुमसत होती.

सुमारे पाच वर्षांत घनकचऱ्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी पाठविण्यात आला. मात्र, त्याचा वापर योग्य प्रकारे करण्यात आला नाही. हा प्रकार उघडकीस येऊ नये यासाठी कचरा डेपोला आग लावण्यात आली असावी, असा आरोप नागरिकांनी करून याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

सुरक्षा रामभरोसे

पालिकेचे वर्षाला तब्बल सव्वाशे कोटींचे बजेट असताना शहरातील अग्निशमन दलाच्या गाड्या जर नादुरुस्त होऊन पडलेल्या असतील तर शहराची सुरक्षा रामभरोसे असल्याचे विदारक चित्र आहे. शहराची लोकसंख्या सव्वा लाख असून, इतक्या मोठ्या शहरात जर एखाद्या वस्तीत आग लागली तर ती विझविण्यासाठी अग्निशमन दलाकडे गाडीच नसल्याने शहराची सुरक्षा रामभरोसे

हेही वाचा :

The post Nashik : मनमाडचा कचरा डेपो आगीत भस्मसात appeared first on पुढारी.