Nashik : महामार्गावर गोंदेजवळ पोलिस वाहनाचा विचित्र अपघात, तीन पोलिस जखमी

नाशिक : पोलिस वाहनाला अपघात,www.pudhari.news

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा

सचिन मंडलिक, रम्मी राजपूत गुन्ह्या प्रकरणी हायकोर्टात एफिडेविट देण्यासाठी जाणाऱ्या सरकारी वाहनाचा विचित्र अपघात झाला आहे. अपघात तीन पोलीस जखमी झाले आहेत. मुंबई आग्रा महामार्गावरील इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला औद्योगिक वसाहतीतील लिअर कंपनीजवळ हा विचित्र अपघात झाला.

नाशिकहुन मुंबईच्या दिशेने जातांना ही घटना घडली असून अपघात इतका भीषण होता की यात पोलिसांच्या वाहनाने तीन पलट्या मारल्या. तीन वाहनांचा हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघात झाल्यानंतर अपघातातील एक वाहन पसार झाले आहे. या घटनेत नाशिक शहर दलाचे ३ पोलीस जखमी झाले आहेत. संतोष भगवान सौंदाणे (५७), सचिन परमेश्वर सुक्ले (४३), रविंद्र नारायन चौधरी (३७) अशी जखमी पोलिसांची नावे आहेत.

जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांना अपघाताची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने अपघाताच्या ठिकाणी दाखल होऊन जखमींना वाडीवऱ्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. मंगळवारी रात्री इगतपुरी जवळ झालेल्या अपघातात ३ युवक ठार झाल्याची घटना झालेली आहे. इगतपुरी ते नाशिक दरम्यान रोज लहान मोठे अपघात सुरु आहेत. ह्या अपघातांची कारणे शोधून त्यावर युद्धपातळीवर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

The post Nashik : महामार्गावर गोंदेजवळ पोलिस वाहनाचा विचित्र अपघात, तीन पोलिस जखमी appeared first on पुढारी.