Nashik : मार्केट यार्डसमोरील वडाचे झाड कोसळले

पंचवटीत वडाचे झाड कोसळले,www.pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पंचवटीतील दिंडोरी रोडवर असलेल्या महालक्ष्मी टॉकीज समोरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर वडाचे झाड कोसळले आहे. या घटनेत एक दुचाकी व एक रिक्षा अशी दोन वाहने या झाडाखाली दबली गेली आहेत. दुचाकीस्वार जखमी असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नाशिक शहरात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून संततधार पाऊस सुरु होता. या पावसात अनेक वाडे-घरे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातच आज (दि. 20) अकरा वाजेच्या सुमारास मुख्य मार्केट यार्डासमोरील अतिशय जुने असलेले वडाचे झाड कोसळले. या झाडाखाली दाबली गेलेली रिक्षा काढण्याचे काम सुरु असून, रिक्षाचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. या घटनेनंतर लागलीच पोलिस घटनास्थळी पोहचले असून मदत कार्य सुरु आहे.

नाशिकमध्ये याआधी पावसामुळे गुलमोहराचे झाड कोसळल्याने जीवितहानी देखील झाली आहे. आज झालेल्या  घटनेमुळे जुन्या वृक्षांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून अशी धोकादायक व जुनी झालेली झाडी काढण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

हेही वाचा :

The post Nashik : मार्केट यार्डसमोरील वडाचे झाड कोसळले appeared first on पुढारी.