
मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळ्यांमधील एका कृषीसेवा केंद्राला मंगळवारी दि.6 सकाळी अचानक आग लागली. तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
अवघ्या काही मिनिटांत आग शमविण्यात यश आले. परंतु, तत्पूर्वी भडकलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात औषधे, खते यांना झळ पोहोचली. या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दाभाडी येथील अनिल निकम यांचे हे शिवनेरी कृषी सेवा केंद्र असल्याचे सांगण्यात येते आहे.
हेही वाचा :
- लातूर : पानगावात ढगफुटीसारखा पाऊस
- Car Thief : ५ हजार गाड्यांची चोरी, खून, ३ पत्नी अन् बरंच काही, देशातील सर्वात मोठ्या कारचोराला अटक
- पुणे : आता मिरवणुकीत चक्क फोल्डेबल रथ! मेट्रोच्या पुलामुळे मंडळांनी काढली शक्कल
The post Nashik : मालेगावी कृषीसेवा केंद्राला भीषण आग appeared first on पुढारी.