Nashik: मालेगाव नाशिकमध्ये रुग्णवाढ घटण्यामागचं नेमकं कारण काय? ABP Majha
<p>मालेगाव कायमच धगधगणार दाट लोकवस्तीच शहर.. दारिद्रय, अस्वच्छता, बकालपणा, नागरिकांचा असहकार, लोकप्रतिनिधीची अनास्था अशा एक ना अनेक समस्यांनी घेरलेले मालेगाव नेहमीच चर्चेत राहिले आहे. याच मालेगावने कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत राज्य सरकारची झोप उडवली होती. कोरोनाचा अचानक विस्फोट झाल्यानं आरोग्य यंत्रणाही हादरून गेली होती. आरोग्य कर्मचारी, शेकडो पोलीस कोरोनाच्या विळख्यात अडकल्याने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन मिशन मालेगाव हाती घेतले. हळूहळू मालेगाव पूर्व पदावर आले. मात्र आता हेच मालेगाव कुतूहलाचा विषय ठरलंय. राज्यात सर्वत्र गुणकार पद्धतीने रुग्णसंख्या वाढत असताना मालेगावात सक्रिय रुग्णांची संख्या अवघी 55 आहे. त्यामुळे मालेगावच्या कोरोना मुक्तीचे रहस्य नेमके काय हा प्रश्न उपस्थित होत आहे. </p>