Nashik : मुंबईतून लोकलनं गाठता येणार नाशिक, लवकरच होणार ‘मेमू लोकल’ची चाचणी

<p>लवकरच मेमू लोकलनं कल्याण-नाशिक प्रवास करता येणार आहे. डिसेंबरमध्ये नाशिक-कल्याण दरम्यान मेमू लोकलची चाचणी होणार आहे. चाचणी यशस्वी झाल्यास पुढच्या वर्षी मेमू लोकल सुरू होईल अशी अपेक्षा आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आणि रेल्वे इंजिन तज्ज्ञ वामन सांगळे या लोकलसाठी प्रयत्न करत आहेत. नाशिक-मुंबई प्रवासासाठी सध्या राज्यराणी, पंचवटी अशा रेल्वे आहेत. आता लोकल सुरू झाली तर त्याचा फायदा शेतकरी, महिला, विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिकांनाही होणार आहे.</p>