Nashik : मुंबई नाक्यावर ट्रकच्या धडकेत दोन कारचे नुकसान

ट्रकची धडक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मुंबई नाका पोलिस ठाण्यासमोर एका अवजड ट्रकने धडक दिल्याने दोन दुचाकींचे नुकसान झाले. सुदैवाने गंभीर अपघात नसल्याने जीवितहानी टळली. या अपघातात दुचाकीस्वाराने प्रसंगावधान राखत उडी मारल्याने त्याचाही जीव वाचला. मात्र, अपघातामुळे परिसरात सुमारे तासभर वाहतूक कोंडी झाली होती.

गेल्या आठवड्यात मद्यधुंद चालकाने कार चालवत दोघांना गंभीर जखमी केल्याचा प्रकार घडला. ही घटना ताजी असतानाच मुंबई नाका पोलिस ठाण्यासमोर सोमवारी (दि.२१) दुपारच्या सुमारास हा अपघात घडला. मुंबई नाका चौफुलीकडे येणाऱ्या मिक्सर ट्रकवरील (एमएच१४, एएएस ९१३४) चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे ट्रक नियंत्रणाबाहेर गेल्याने तो कारवर आदळला. ट्रकची धडक बसल्याने कारचालकाचाही ताबा सुटला व कार दुसऱ्या कारवर पाठीमागून जाऊन धडकली. या अपघातामध्ये एक दुचाकी चालकदेखील सापडला; मात्र त्याने दुचाकीवरून उडी मारल्याने तो बचावला.

या अपघातात दोन कारचे प्रचंड नुकसान झाले. अपघातानंतर ट्रकचालकाने भर रस्त्यात ट्रक सोडून पळ काढला. अपघातानंतर वाहतूक कोंडी झाली. घटनेची माहिती समजताच मुंबई नाका पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करीत वाहतूक सुरळीत केली. ट्रकचालकाचा शोध घेतला जात आहे.

हेही वाचा :

The post Nashik : मुंबई नाक्यावर ट्रकच्या धडकेत दोन कारचे नुकसान appeared first on पुढारी.