Nashik : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता धर्मयुद्धाला तयार राहा; मंदिरं खुली करण्यासाठी भाजप आक्रमक

<p>कोरोनाचा प्रकोप सुरु झाल्यानंतर &nbsp;राज्यातील मंदिरं बऱ्याच काळापासून बंद आहेत. ही मंदिरं उघडावीत या मागणीसाठी आता भारतीय जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेतली असून आज &nbsp;राज्यभरात ठिकठिकाणी शंखनाद आंदोलन करत मंदिरं उघडण्याची मागणी केली आहे. &nbsp;पुण्यात कसबा गणपती मंदिरासमोर भाजपा प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. &nbsp;</p> <p>चंद्रकांत पाटील म्हणाले की, शिवसेनेनाल दोन साथीदार असे मिळाले त्यांना देवावर विश्वास नाहीय. &nbsp;अल्पसंख्याकांना खुश करण्यासाठी असं करावं लागतंय. &nbsp;खुर्ची टिकवण्यासाठी आणि दोन्ही पक्षांना खुश करण्यासाठी सरकार मंदिरं खुली करत नाहीयत. लॉकडाऊनचे नियम सर्वांना सारखे पाहिजेत. &nbsp;दारू घरी पोहचवतात. &nbsp;सोबत असणाऱ्या दोन्ही पक्षांना खुश करण्यासाठी मंदिरं खुली केली जात नाहीत, असा आरोप त्यांनी केला.&nbsp;</p>