Nashik : मुसळधार पावसामुळे गंगापूर धरण तुडुंब, गोदाकाठावरील सर्व मंदिरं पाण्यात, सतर्कतेचा इशारा

<p><strong>Nashik :</strong> गेल्या दोन दिवसापासून सुरू असणाऱ्या पावसामुळे&nbsp;गोदावरी नदीच्या यंदाच्या मोसमातील पहिला&nbsp; पूर आलाय, गोदा काठावरील सर्व मंदिर पाण्याखाली गेलीय, दुतोंड्या मारूतीच्या गळ्यापर्यंत पाणी लागलं असून रामसेतू पुलाला पाण्याच्या लाटा धडकू लागल्यात, मागील आठवड्यात ही&nbsp;गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झाली होती मात्र तेव्हा 4 हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता.</p>