Site icon

Nashik : येवल्यातील राखीव वनक्षेत्रात ट्रॅप कॅमेरे ; सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित

नगरसूल : पुढारी वृत्तसेवा

येवला तालुक्यातील राजापूर ममदापूर वनसंवर्धन राखीव क्षेत्रात वनविभागाच्या जंगलात ठिकठिकाणी बुद्धपौर्णिमेनिमित्त कॅमेरे व पाच पाणवठ्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. ट्रॅप कॅमेरे लावून वन्यजीवांचा संचार यात पाहायला मिळाला. ही संकल्पना नाशिक पूर्वचे उमेश वावरे व सहायक वनरक्षक सुजित नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली येवला वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.

भुलेगाव, राहडी, ममदापूर, पिंपळखुटे बुद्रुक, राजापूर, सोमठाणजोश, पिंपळखुटे तिसरे, जायदरे, आहेरवाडी, कुसमडी, राखीव वनातील पाणवठ्यावर हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मचाणावर थांबून पुरवठ्यावर पाणी पिण्यासाठी येणारे वन्यजीव, तरस, लांडगे, कोल्हे, ससे, काळवीट, खोकड, घुबड, मोर, मुंगुस, उदमांजर इतर वन्यजीवांची नोंद घेण्यात आली. वन्यप्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठे तयार केलेले असून, वन्यप्राण्यांची तहान भागवण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून विशेष लक्ष दिले जात आहे. तसेच हरिण काळवीट यांना उन्हाळ्यात वडपाटी पाझर तलावाच्या बाजूने गवती रोपवाटिका यशस्वी झाली असल्याने गवत लागवड केली आहे व अजून पावसाळ्यात गवत लागवड केली जाणार असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी जंगलात वनपाल माळी ममदापूर वनरक्षक गोपाल हारगावकर, गोपाल राठोड, वनसेवक रामनाथ भोरकडे, आप्पा वाघ, मच्छिंद्र ठाकरे, सोमनाथ ठाकरे यांनी यासाठी परिश्रम घेतले.

हेही वाचा :

The post Nashik : येवल्यातील राखीव वनक्षेत्रात ट्रॅप कॅमेरे ; सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित appeared first on पुढारी.

Exit mobile version