
नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यािविषय आक्षेपार्ह वक्त्यव केल्याचे पडसाद सर्व देशभर उमटत आहेत. नाशिकच्या येवला शहरात देखील भुट्टो यांच्या अशोभनिय वक्यव्याचे पडसाद उमटले. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने विंचूर चौफुली येथे आज शनिवार (दि.17) बिलावल याच्या फोटोला जोडे मारून, दहन करून निषेध नोंदवण्यात आला. पाकिस्तान मुर्दाबाद, नरेंद्र मोदी जिंदाबाद अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
बिलावल यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना त्यांना पंतप्रधान होईपर्यंत अमेरिकेत येण्यास बंदी होती. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंतप्रधान व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परराष्ट्र मंत्री आहेत, अशी टीका केली होती. पाकिस्तान अनेक दशकांपासून सतत दहशतवाद आणि दहशतवादी संघटनांना आश्रय आणि प्रोत्साहन देत आहे. पाकिस्तानची अंतर्गत सुरक्षा आणि आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. तेथे भीषण अंतर्गत संघर्ष आणि जीवघेणी मारामारी होत असताना त्यांनी त्यांच्या देशाकडे लक्ष द्यावे अशी टीका युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मयुर मेघराज यांनी केली.
तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा 135 कोटी देशवासीयांना अभिमान आहे. त्याच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणा-या बिलावल भुट्टोचा आम्ही निषेध करत असल्याचे शहराध्यक्ष तरंग गुजराथी म्हणाले. यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष प्रमोद सस्कर, जिल्हा नेते मनोज दिवटे, कोषाध्यक्ष पुरुषोत्तम रहाणे, महिलामोर्चा अध्यक्ष अनुपमा मडे, रत्ना गवळी, उपाअध्यक्ष जितेंद्र करेकर, बाबू खानापुरे, मनोज पैंजणे, हेमचंद्र व्यवहारे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा :
- HBD John Abraham : महेश भट्ट यांच्या ‘जिस्म’साठी जॉनला असा मिळाला ब्रेक
- वडगाव मावळ : ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराची पालकमंत्र्यांवर वेळ ; आमदार सुनील शेळके यांची टीका
- वडगाव मावळ : ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराची पालकमंत्र्यांवर वेळ ; आमदार सुनील शेळके यांची टीका
The post Nashik : येवल्यात पाकिस्तानचे मंत्री बिलावल भुट्टोच्या फोटोला जोडेमारो appeared first on पुढारी.