Nashik : येवल्यात लव्ह जिहाद विरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा मूक मोर्चा

येवला मोर्चा,www.pudhari.news

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा

दिल्ली येथे श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपीला कठोर शिक्षा करण्याच्या मागणीसह लव्ह जिहाद विरोधी तसेच धर्मांतरविरोधी कायदा करण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चात श्रीराम नवमी उत्सव समिती, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्रीय राजपूत करणी सेना अशा विविध संघटनांनी सहभाग घेतला होता.

मोर्चात सहभागी नागरिक, महिलांनी हाताला काळी पट्टी बांधून घटनेचा निषेध नोंदवला. तसेच तहसील प्रशासनाला दिलेल्या निवेदनात संशयित आफताबला कठोर शिक्षा करावी. लव्ह जिहादची समस्या सारख्या घटनांना आळा घालण्यासाठी कायदा करावा, अशी मागणी करण्यात आली.

हेही वाचा :

The post Nashik : येवल्यात लव्ह जिहाद विरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा मूक मोर्चा appeared first on पुढारी.