Nashik : राज्य सरकारच्या कारभाराविरोधात नाशिकमध्ये भाजपची जन आक्रोश आंदोलनाची हाक

<p><strong>नाशिक :</strong>&nbsp;भारतीय जनता पक्षाने राज्य सरकारच्या विरोधात जन आक्रोश आंदोलनाची हाक दिली आहे. ओबीसी आरक्षणाला मिळालेली स्थगिती, राज्य सरकारचा दोन वर्षांचा कारभार, नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर मोर्चा काढण्यात येणार आहे. &nbsp;शुक्रवारी सकाळी 10 वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे &nbsp;मैदानापासून मोर्चाला सुरवात होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ त्याचा समारोप होणार आहे.&nbsp;</p>