Nashik : राज्य सरकारच्या कारभाराविरोधात नाशिकमध्ये भाजपची जन आक्रोश आंदोलनाची हाक

नाशिक : भारतीय जनता पक्षाने राज्य सरकारच्या विरोधात जन आक्रोश आंदोलनाची हाक दिली आहे. ओबीसी आरक्षणाला मिळालेली स्थगिती, राज्य सरकारचा दोन वर्षांचा कारभार, नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर मोर्चा काढण्यात येणार आहे.  शुक्रवारी सकाळी 10 वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे  मैदानापासून मोर्चाला सुरवात होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ त्याचा समारोप होणार आहे.

नाशिक महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता भाजपने राज्य सरकारच्या विरोधात वातावरण तापवायला सुरुवात केली असून शुक्रवारचं आंदोलन हे त्याचाच भाग आहे.  नाशिक निवडणुकीवर सर्वच पक्षांचं लक्ष असून सर्वांनीच तयारी सुरु केली आहे.

कोणत्याही परिस्थितीत सत्ता आपल्याकडे राखायची असा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठीच भाजपने शहरात विविध कार्यक्रम राबवायला सुरुवात केली आहे. भाजपसमोर सध्या महाविकास आघाडीचे आव्हान आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष जर एकत्र आले तर भाजपची अडचण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाजपनेही आता कंबर कसली असून तशी तयारी सुरु केली आहे.

निवडणूक पूर्णपणे घ्या किंवा थांबवा- राज्य सरकारची मागणी
एकतर निवडणुका पूर्णपणे घ्या किंवा पूर्णपणे थांबवा, अशी मागणी घेऊन राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. याप्रकरणी 13 तारखेला सुनावणी होणार आहे. ओबीसी आरक्षणासाठी लागणारा इम्पेरिकल डेटा राज्य मागत आहे तर का दिला जात नाही? उज्ज्वला योजना वगैरे योजनांसाठी हा डेटा चालतो मग राज्यांना का देत नाही? असा सवाल राज्याचे मंत्री छगन भुजबळांनी उपस्थित केला आहे.

संबंधित बातम्या :

पूजा करण्यावरुन वाद, पुजाऱ्यांनी एकमेकांवर बंदुका ताणल्या, गावगुंडाप्रमाणे हाणामाऱ्या, त्र्यंबकेश्वरमधील प्रकार

School Reopen : नाशिक शहरातील शाळा 13 डिसेंबरपासून, शिक्षण विभागाचा निर्णय

Needle Free Vaccine : नाशिक-जळगाव जिल्ह्यात 'नीडल फ्री' लसीकरण; अशी देणार लस