Nashik | रुग्णालयातून दीड वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण;जिल्हा रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

एका दिड वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात समोर आली असून जिल्हा रुग्णालयाचा सुरक्षेचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आलाय. अपह्रत मुलीला घेऊन तिची आई आणि मावशी आज सकाळी 11.30 च्या सुमारास जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आली होती. बहिणीला बाळंतपणासाठी दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याने मुलीची आई धावपळ करीत होती.