Nashik | रेमडेसिवीरच्या तुटवड्याविरोधात रुग्णांच्या नातेवाईकांचं तीव्र आंदोलन

<p><span class="il">नाशिक</span>मध्ये कोरोनाचा कहर आता वाढत असून रुग्णाच्या नातेवाईकांचा उद्रेक बघायला मिळाला, रेमीडिसिव्हर इंजेक्शन मिळत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या मेहेर सिग्नल चौकात रुग्णांचे नातेवाईक रस्त्यावर उतरले. रस्त्यावरच नागरिकांनी ठिय्या मांडून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी विरोधात घोषणाबाजी केली, एकीकडे रुग्ण रुग्णलयात अत्यवस्थ आणि दुसरीकडे इंजेक्शनसाठी तासंतास रांगेत उभे राहुन ही औषधे मिळत मिळत नसल्याने नातेवाईकांचा बांध फुटू लागला असून हळूहळू उद्रेक बघायला मिळतोय. रोज साडेतीन चार हजार इंजेक्शन येत आहते, रुग्णांना आता त्यांच्या नावानिशी बेडवरच औषध देण्याची व्यवस्था केली जाईल असे दावे प्रशासन करत आहेत, मात्र वस्तुतिष्ठीत विपरीत आहे याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी</p>