Site icon

Nashik : लासलगावी शनिवारपासून श्री बालाजी मंदिराचा ब्रह्मोत्सव

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

सालाबादप्रमाणे श्री बालाजी मंदिराचा ३१ वा ब्रह्मोत्सव शनिवार (दि.११) ते सोमवार (दि.१३) पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री बालाजी मंदिर सेवा समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

शनिवार (दि. ११) रोजी सकाळी ८ ते ९ या वेळेत श्री गरुड ध्वजारोहण श्रीरामधून, सामुदायिक श्री हनुमान चालिसा पाठ, आरती व प्रसाद होणार आहे. सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत शहरातील विविध शाळेतील शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ४ ते ६ या वेळेत श्री बालाजी मंदिर महिला समिती यांच्या वतीने श्रीमद् भागवत गीता नृत्य नाटिका सादर केली जाणार आहे. दशावतार व श्रीकृष्ण भगवत भजन माला कार्यक्रम होणार आहे.

रविवार (दि. १२) आपल्या ८ ते ९ या अरुत सहस्र तुलसी, रजत पुष्प अर्चना महालक्ष्मी कुंकुम अर्चना, आरती व प्रसाद संपन्न होणार आहे. दुपारी ४.३० ते ६.३० या वेळेत लक्ष्मीनारायण मंदिर ते बालाजी मंदिर भव्य शोभायात्रा काढली जाणार असून सायंकाळी ७ ते ८ या वेळेत गोविंद प्रसाद पुरस्काराचे वितरण होणार आहे. ८ आठ ते १० या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

सोमवार (दि. १३) रोजी सकाळी ८ ते ९.३० या वेळेत नव कलश अभिषेक होणार असून ब्रह्मोत्सवाची सांगता होणार आहे. या ब्रह्मोत्सव सोहळ्यास भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री बालाजी मंदिर सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

The post Nashik : लासलगावी शनिवारपासून श्री बालाजी मंदिराचा ब्रह्मोत्सव appeared first on पुढारी.

Exit mobile version