Nashik : वणीच्या सप्तश्रृंगी देवीच्या भाविकांसाठी मोठी बातमी; ‘या’ भाविकांना प्रवेशबंदी ABP Majha

<p>सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी १० वर्षांखालील मुलं आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आलीय. वणीच्या सप्तश्रृंगी देवस्थान समितीने हा निर्णय घेतलाय. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. दर्शनासाठी येताना मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशन बंधनकारक करण्यात आलंय.&nbsp;</p>