Nashik : वणी येथे वाहनासह अवैध देशी-विदेशी दारू जप्त 

मद्यसाठा जप्त,www.pudhari.news

वणी : पुढारी वृत्तसेवा : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत लखमापूर फाटा येथे वणी पोलिसांनी अवैध देशी-विदेशी दारुचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दारुची वाहतुक ज्या वाहनातून केली जात होती ते वाहनही ताब्यात घेतले आहे.

वणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल राजपुत यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, दि. ३० जुन रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या दरम्यान दिडोंरी वरून अवैध देशी व विदेशी दारु घेऊन MH01 N8324 क्रमांकाची काळ्या रंगाची मार्शल जीपगाडी वणी कडे येणार असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला व लखमापुर फाट्याजवळील एका हॉटेल बाहेर उभी असताना ही गाडी ताब्यात घेतली.  जीपगाडीत देशी दारूचे पंधरा बाॅक्स, विदेशी दारुचे तीन बाॅक्स असा एकुण ६१ हजार २७० रुपयांचा माल आढळून आला.  याप्रकरणी चालक सागर अशोक कापसे (२४) रा. वणी याचा शोध घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वणी पोलीस ठाण्याचे सपोनि स्वप्निल राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय आर.एम भरसट तपास करीत आहे.D

हेही वाचा :

The post Nashik : वणी येथे वाहनासह अवैध देशी-विदेशी दारू जप्त  appeared first on पुढारी.